लैंगिक शोषणासाठी मुलांचा व्यापार करणारे दलाल आणि होटेल चालक, विशेषतः लहान मुलींची विक्री करणारे चालक यांच्यावर कठोर व तत्त्काळ कारवाई व्हायला हवी, अशी अपेक्षा लहान मुलांसाठी न्यायाची मागणी करणा-या कार्यकर्त्यांनि व्यक्त केली आहे. लैंगिक शोषण, अत्याचार व हिंसाचार यांच्याबरोबर लहान मुलांना डांबून ठेवणे, त्यांच्यावर अवाजवी निर्बंध लादणे या गुन्ह्यांचीही गंभीर दखल घ्यावी, असे “इंटरनल जस्टिस मिशन” या मुलांच्या अवैध व्यापाराविरुद्ध लढणा-या संघटनेच्या प्रतिनिधि अँडव्होकेट मिशेल मेंडोसा यानी म्हटले आहे. त्या म्हणतात, “मुलांचा व्यापार लैंगिक विकृति भागविण्यासाठी होतो, की कमी पैशात राबवून काम करुन घेण्यासाठी होतो, या चर्चेपेक्षा त्यांचा व्यापार गुन्ह्यांमध्ये जमा होणे ही खरी महत्वाची गोष्ट आहे. मुलांसाठी स्थापन होणा-या न्यायालयाचा उपयोग या गंभीर गुन्ह्यांची तातडीने दखल घेण्यासाठी व्हायला हवा.
discuss |
tags:
court kidall |
category:
LetsDiscuss
| Content type:
Text/Pictures
| Add this link to...
| tell a friend | bakwaas Add to:
| my favorites / bookmarks
comments
To login and comment on this story register here .
comments